भारत भारतीय आणि भारतीयत्व
"India is the cradle of human race, the birthplace of human speech, the mother of history, the grandmother of legend & the great grandmother of tradition. Our most valuable and astrictive materials in the history of man are treasured up in India only..."
Mark Twain (American Author)
"If there is one place on the face of earth where all the dreams of living men have found a home from the very earliest days when man began the dream of existence, it is India..."
Romain Rolland (French Scholar, Art Historian)
आपण भारतीय असल्याचा आतंरिक अभिमान आपणा सर्वाना आहेच आणि तसा तो असायलाच हवा. अगदी जन्मापासूनच आपली संस्कृती, शिष्टाचार,सभ्यता मनात खोलवर रुजते आणि तिच देशभक्ती, देशप्रेम आणि देशाभिमान यातून प्रतिबिम्बित होत असते. याच अपेक्षित व आल्ल्हाददायक वातावरणात जगभरातील विविध महान तत्ववेत्यांच्या मतांचे प्रतिनिधित्व करणारी मार्क ट्वेन, रोमेन रोलंड यांची ही वाक्ये भारतीय संस्कृतीच्या भव्यतेची अलगद जाणीव करुन देतात.
विविध भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म यांचा वारसा सांगणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या समृद्धतेबद्दल जगाच्या पाठीवर कोठेही दुमत असण्याचे कारण नाही. संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात जगभरात अनेक महासत्ता म्हणून उदयास आल्या, मात्र त्यांचा अधिराज्य गाजवण्याचा काळ मर्यादितच राहिला. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे या सर्व महासत्ता युद्ध, शस्त्रास्त्र, रक्तपात, राजकीय शक्ती इत्यादी पोकळ पायाभरणीतून निर्माण झाल्या. भारत हा हजारो वर्षांपासून शांतता व आनंदात नांदत आहे. अनेक परकीय आक्रमणे परतवून लावलेल्या भारताने एकदाही इतर राष्ट्रांवर आक्रमण करून सत्ता गाजवल्याचे इतिहासात दिसत नाही. अर्थात यात भित्रेपणा अथवा राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा ही कारणे नसून इतिहास तात्विकपणे अभ्यासल्यास आपणास हे लक्षात येईल की या गोष्टीस कारणीभूत आपली समृद्ध संस्कृती, प्रगल्भता, शिष्टाचार या गोष्टी आहेत.
इतिहासाचा अभ्यास हा प्रत्येक टप्प्यावर प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरत असतो. आज 'भारतीय' म्हणून जगत असताना खरे 'भारतीयत्व' जपण्यासाठी आपणा सर्वाना 'भारत' समजून घेणे महत्त्वाचे
प्रामुख्याने शांतता, अहिंसा व त्याचबरोबर सखोल अभ्यास, ज्ञान, विज्ञान जोपासणारी भारतीय संस्कृती ही जगातील सर्वाधिक प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. केवळ हिन्दुत्वापुरते मर्यादित न राहता संपूर्ण
मानवजातीचा वारसा सांगणारे वेद, उपनिषद हे भारताने जगास दिले आहेत. जगातील बहुतांश सर्व
संस्कृतींच्या ऐतिहासिक साहित्यात मानवतेलामहत्त्व दिलेले दिसून येईल. मात्र अधिक प्रगल्भ व व्यापक दृष्टीकोन भारताने 'भूतदया' या संकल्पनेतून विश्वाला दिला. तत्कालीन पाश्चीमात्त्य जगतात
फोफावलेल्या गुलामगिरीच्या प्रथेची मुळे भारतात रुजली नाहीत. आजही देशविदेशात लोकप्रिय असणारा बुद्धीबळाचा खेळ प्राचीन भारतीयांचा आवडता खेळ असल्याचे पुरावे इतिहासात मिळतात. मध्ययुगीन
भारतात क्षेपणास्त्र व अग्निबाण यांच्या तंत्रज्ञानाला चालना देणाऱ्या टिपू सुलतानाचे छायाचित्र
नासाच्या प्रमुख कार्यालयात असल्याचे ऐकून बहुतेकांना नवल वाटेल!!
गणित, शास्त्र, वैद्यकीय अभ्यास, कला,स्थापत्यशास्त्र, संगीत, नृत्य या क्षेत्रांतील भारताचे योगदान अभ्यासताना एकीकडे गर्वाने ऊर भरून येतो,मात्र त्याचवेळी 'भारतीय' म्हणून आपण जगण्यात कोठेतरी कमी पडत असल्याची सल मनात डोकावत राहते.
प्राचीन भारत अभ्यासताना आपली संस्कृती अतिप्रगत व समृद्ध असल्याचे जाणवत राहते. त्याचवेळी जातपात,खालावत गेलेले स्त्रियांचे स्थान धर्मभक्तीच्या आवरणाखाली वाढत गेलेल्या अंधश्रद्धा इत्यादीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मात्र १९ व २०व्या शतकातील समाजसुधारकांच्या प्रयत्नांनी या सामाजिक अनिष्ट रूढींना आळा घातल्याचे दिसून येते.
आज स्वतंत्र भारताचे नागरिक असताना हरवलेली भारतीयत्वाची जाणीव भारताच्या एकसंधतेतला धोका असल्याचे मला वाटते. सामुहिक व व्यक्तीस्तरावर सोय आणि विकास या अपेक्षेतुन बनलेल्या भाषा , प्रदेश,जाती,धर्म यांविषयीच्या निष्ठेचा अतिरेक होऊन आपण जातीयवाद,प्रांतवाद, धर्मिक, ताणताणाव, भाषावाद इत्यादी राष्ट्रीएकात्मतेस,धोका पुरवणाऱ्या घटकांना सामोरे जात आहोत देशभक्ती व देशप्रेम हे केवळ स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिन येथपर्यंत मर्यादित राहिल्याचे सर्रास आढळून येते .
एकीकडे शास्त्रीय आधारांवर प्रगती करू पाहताना आजही ग्रामीण व अप्रगत भागातजनता अंधश्रद्धेच्या भोवऱ्यात भरडली जात आहे.
भ्रष्टाचार देशाची गंभीर समस्या आहे.आशा गप्पा हाणणाऱ्या अनेकांस सरकारी कर्मचाऱ्यांस काम लवकरव्हावे म्हणून चहापाणी ऑफर करण्याची मनोवृत्ती सोडवत नाही
भारत माझा देश आहे म्हणताना एक असामान्य आपुलकी निर्माण व्हावी या हेतूने वाक्याची तश्याप्रकारे रचना केली गेल्याचे म्हंटले जाते . मात्र प्रत्यक्षात वावरताना खरे भारतीयत्व हरवल्याचे खेदजनक आहे .वसुधैव कुटुंबकम चा वारसा सांगणाऱ्या,आपणा सर्वांची मी आणि माझे इथपर्यंतच संकुचित होऊन ठेपलेली मनोवृत्तीवरील बहुतांश समस्यांचे कारण असल्याचे दिसून येईल.जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीस आपल्या राष्ट्राप्रती असणाऱ्या जवाबदारीची जाणीव होणार नाही तोपर्यंत आर्थिक विकास आर्थिक वृद्धी इ भौतिक बाबी दुय्यम ठरतील.
२०२०पर्यंत भारत हा जगातील सर्वात तरुण देश असणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही सर्वाधिक वेगाने विकासाकडे वाटचाल करत आहे. भारत येत्या काही वर्षात महासत्ता म्हणून उदयास येईल,असेही अनेकांचे म्हणणे आहे .
भारताचा समृद्ध वारसा आणि खरे 'भारतीयत्व' अभ्यासल्यास भारतीयांच्या क्षमतेबद्दल कोठेही प्रश्नचिन्ह उद्भवणार नाही. गरज आहे ती फक्त खरा भारत ओळखून त्याच पायावर अधिक समृद्ध 'भारतीयत्व' उभारण्याची!!
